मुंबई – शासनातील अधिकारी मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाहीमी सरकार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत, असे अनेक आवर्प राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होत असताना आता प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांना चक्क खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एक प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात हि अशी पहिलीच घटना आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
गुन्हा दाखल होण्यामागील कारण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व जनतेला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आणि कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. पण रवींद्र शिंदे यांच्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात काम करत असता हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, रवींद्र शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये खोटी आकडेवारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राजपत्रीत वर्ग १ च्या अधिकाऱ्याविरुद्ध, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंत्राटी अधिकारी झाले शिंदेंवर भारी
रविंद्र शिदे यांची कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख आहे. कोरोना काळात देखील जिल्हापरिषदेच्या माध्यमातून त्यांनी उत्तम काम केले आहे. मात्र स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्वभाव त्यांना नडल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यांचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काही वाद देखील झाले होते. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय तरी राजकारण आहे अशी माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर शिंदे यांच्याविरोधात तक्रार करणारे प्रशांत वाघमारे हे कंत्राटी पद्धतीवर काम करतात त्यामुळे या मागचा सूत्रधार दुसरा कुणी नाही ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
Join Our WhatsApp Community