मुंबई महापालिकेच्या विकासकामांचा गुरुवारी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव घेणार आढावा

185

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षासह भाजपनेही कंबर कसलेली असतानाच महापालिकेचा कारभार हाकणाऱ्या प्रशासकांच्या कार्यपध्दतीवरही त्यांचा बारीक लक्ष आहे. निवडणुकीपूर्वी महत्वाच्या विकास प्रकल्पांची कामे जलदगतीने व्हावी तसेच नवीन कामांना सुरुवात व्हावी यासाठी आता महापालिकेच्या सर्व विभागांचा आढावा नगरविकास खात्यांचे प्रधान सचिव हे घेणार आहे. गुरुवारी याबाबतची आढावा बैठक नगरविकास खात्याचे प्रधान सचिव घेऊन याचा अहवाल ते राज्याचे नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री यांना सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : तौक्ते वादळात सापडलेल्या गिधाडांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याअभावी पाठवले नॅशनल पार्कमध्ये)

महापालिकेच्या विकास कामांचा आढावा घेणार

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासकामे केली जात आहेत. मात्र,मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्यादृष्टीकोनातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून आता मुंबईतील महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. नगरविकास खाते हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मुंबईतील सुरु असलेल्या कामांना वेग देणे आणि नवीन कामांना सुरुवात करणे हे महत्वाचे असून त्यादृष्टीकोनातून नगरविकास खात्याचे प्रधान सचिव हे महापालिकेच्या विकास कामांचा आढावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या सर्व विभाग आणि खाते यांच्यावतीने सुरु असलेली पायाभूत विकास प्रकल्प तसेच विकास कामे आणि योजना आदींची माहिती विभाग आणि खात्यांना सादर करण्यास सांगितले आहे. गुरुवारी ८ सप्टेबर रोजी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव हे महापालिकेचे प्रशासक, सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच विभाग व खातेप्रमुख यांची बैठक घेऊन हा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक महत्वाची मानली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.