नागपूर विमानतळ ठरतेय सोने तस्करीचा नवा अड्डा; पोलीस आयुक्तांची माहिती

144

नागपूर विमानतळ हा दुबईमार्गे सोने तस्करीचा नवा मार्ग ठरतो आहे. नागपूर पोलिसांनी विमानतळाच्या पार्किंगमधून तिघांना ताब्यात घेतले. या तिघांनी यापूर्वीच्या दरोड्यात टिपरचे काम केले होते. कस्टम ड्यूटी वाचविण्यासाठी या कामगारांचा उपयोग तस्करीत केला जातो अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

( हेही वाचा : मुंबईत दहशतवादी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण, कबरीचे मजारमध्ये रूपांतर?)

याबाबत पोलिस आयुक्तांनी सांगितले की, शारजा, दुबई येथे मजूरी करण्यासाठी येथे संपूर्ण राज्यातून तसेच देशातून मोठ्या संख्येने मजूर व कामगार जातात. यात राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करीसाठी प्रामुख्याने नागौरचे रॅकेट कार्यरत असल्याचे आहे. दुबई व शारजा आदी ठिकाणी गेलेले नागौर येथील कामगार परत येताना मोठ्या बॅगा घेऊन येतात. या बॅगांमध्ये घोंगडे तसेच लोखंडाच्या कांबी असतात. नागपूर विमानतळाच्या पार्कींगमध्ये हे कामगार बॅगांची अदलाबदली करतात. या कामगारांजवळ नागपूर विमानतळावर कोणाला बॅग द्यायची त्याचे छायाचित्र असते. तर घेणाऱ्याजवळ कामगाराचे छायाचित्र असते. हे छायाचित्र दाखवून ओळख पटवून बॅग दिली जाते. या बॅगेतील घोंगड्यांवर सोन्याचे पाणी मारलेले असण्याची शक्यता अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.

नवीन इंटेलिजन्स सेल स्थापन करण्यात येणार

विमानतळावर गेल्या 7 वर्षांत तब्बल 4 कोटी 96 लाखांहून अधिक किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. शिवाय शस्त्रे, मद्य, ड्रोन, सिगारेटही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहे. सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांचे नागपूर विमानतळावर विशेषत: शारजहा, दुबई येथून नागपूरात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष असते. या दोन्ही ठिकाणावरून प्रवासी शरीरात सोने लपवून आणतात. सीमा शुल्क चुकवण्यासाठी असे प्रकार घडतात. यासोबतच नागपूरात अंमली पदार्थ तस्करी तसेच आरोपी पकडण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी लवकरच नवीन इंटेलिजन्स सेल स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.