केंद्रीय गृहमंत्री यांच्या ताफ्यात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या इसमाला अटक

145
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला मलाबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला इसम हा केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकारी असल्याचे सांगून मुंबई पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी मुंबईत लालबागचा राजा येथे गणेश दर्शनासाठी कुटुंबासह आले होते. अमित शहा हे अतिमहत्त्वाचे व्यक्ती असल्यामुळे मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील एक व्यक्ती कोट टाय घालून शहा यांच्या ताफ्यात संशयास्पदरित्या फिरत होता. अमित शहा हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला आणि मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगला येथील निवासस्थानी आलेले असताना, त्या परिसरात कोट तसेच टाय गळ्यात घालून सरकारी ओळखपत्र दाखवत एक संशयित इसम शहा यांच्या ताफ्यात फिरत असताना, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलीसांनी तत्काळ मलबार हिल पोलिसांना कळवले.
मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने या संशयित इसमाला नाना चौक येथून ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने सरकारी  ओळखपत्र दाखवुन केंद्रीय गृहमंत्रालयाचा अधिकारी असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी असता तो तोतया अधिकारी असल्याचे समोर आले. मलबार हिल पोलिसांनी त्याला अटक करून गिरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव हेमंत पवार असून तो मूळचा धुळे जिल्ह्यातील असून तो अमित शहा यांच्या ताफ्यात कशासाठी फिरत होता त्याचा हेतू काय होतं याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.