राज्यात काही जिल्ह्यांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झाले आहे. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिका-यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून, या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करा
ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत पुरवण्याचे सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिका-यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
( हेही वाचा: NEET UG-2022 परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातील इतके विद्यार्थी उत्तीर्ण )
कोकणातही पावसाने लावली जोरदार हजेरी
कोकणातही वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात सलग तिस-या दिवशी मुसळधार पाऊस पडला. पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विक्रमगड जव्हार मोखाडा भागात जोरदार पाऊस झाला.