राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनांना सावधगिरीच्या सूचना

134

राज्याच्या विविध भागात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही पावसाने कहर केला. आज गुरूवारीही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यभरात पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मराठवाडा, विदर्भाक पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून हवामान विभागाने पावसाचा जोर वाढण्याचा इशाराही दिला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

(हेही वाचा – नरेंद्र मोदी मोठे नेते, बरोबरी होऊ शकत नाही! बावनकुळेंचा शरद पवारांना इशारा )

पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

काल, बुधवारीही राज्यातील काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.