ससून रुग्णालयातील हिंदू राष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरवरच्या हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

209

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) गुन्हा दाखल असलेला व हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर सोमवारी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात चौघांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली. या चौघांकडून पोलिसांनी एक तलवार, चॉपर, देशी बनावटीचे पिस्तूल आणि गुन्हात वापरलेले जिवंत काडतूस जप्त केले आहे.

(हेही वाचा- अमरावतीमधील ‘लव्ह-जिहाद’ प्रकरणातील ‘ती’ तरुणी सापडली साताऱ्यात! )

बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपायुक्त (झोन II) सागर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सागर हनुमंत ओव्हाळ (22), त्याचा भाऊ, बालाजी (23), सूरज शेख (19) आणि सागर आटोळे (21) यांना अटक केली. हे सर्व हडपसर येथील आहेत. सिंहगड रोडवरील पानमळा येथील घरात ते लपून बसले होते. हे सर्व जण हंबीरच्या प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.

तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कानुसार गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात आहे. आजारी असल्यामुळे त्याच्यावर 25 ऑगस्टपासून ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हंबीर याच्यावर उपचार सुरु असलेल्या ठिकाणी हे हल्लेकरी आले, त्यांनी हंबीरला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोराने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.