विमानाने मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत आरामदायक प्रवास देण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) पासून दक्षिण मुंबई/बॅकबे आगार, एअरपोर्ट ते जलवायू विहार/खारघरद्वारा पाम बिच रोड आणि एअरपोर्ट ४ ते कॅडबरी जंक्शन/ठाणे अशा तीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा : अनंत चतुर्दशीला मुंबई सेंट्रल – चर्चगेट दरम्यान लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार)
या मार्गावर आता ९ सप्टेंबर २०२२ पासून बेस्टच्या चलो अॅपचा वापर करून तिकीटाचे आगाऊ आरक्षण करून प्रवासी सदर बससेवेचा लाभ घेऊ शकतात.
याकरता खालील प्रक्रिया प्रवाशांना फॉलो करावी लागेल…
- गुगल प्ले स्टोअरवरून बेस्ट चलो अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर दक्षिण मुंबई/बॅकबेकरिता बसमार्ग क्रमांक ८८१, वाशी/खारघर करता बसमार्ग क्रमांक ८८२ आणि ठाण्याला जाण्यासाठी बस क्रमांक ८८४ सर्च बारमध्ये शोधा.
- बसमार्गाची निवड केल्यावर रिझर्व सिट पर्याय निवडावा.
- बसमध्ये चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण निवडावे.
- आपली वेळ निवडून तिकीटाची रक्कम भरावी.
- आपली बस ट्रॅक करून आरक्षित केलेल्या आसनाद्वारे आरामदायक प्रवास करावा.
- सर्व प्रवाशांनी या आरामदायक बससेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.