सुषमा अंधारेंनी ओकली गरळ, हिंदुत्वविरोधी भूमिकेवरुन उद्धव ठाकरे काय करणार?

187

93च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण करण्यात आल्यामुळे भाजपकडून आता उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर टीका करण्यात येत आहे. त्याला उत्तर देताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचे सांगत त्यांनी भाजपला सवाल केला आहे.

हे त्यांचे हिंदुत्व आहे का?

या देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे ज्यांचे रक्तरंजित कपडे आज जपून ठेवले जातात, त्यांच्या अस्थिही जपून ठेवल्या जातात आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा गांधींच्या फोटोला गोळ्या घातल्या जातात, हा प्रकार हे नकली हिंदुत्ववादी मान्य करतात का?, हे त्यांचे हिंदुत्व आहे का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी भाजपला केला आहे.

(हेही वाचाः केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!)

भाजपला सवाल

याकूब मेमनच्या कबरीची सजावट करणं,त्यावर फुलं चढवणं हे वाईटच आहे. पण याकूब मेमनची फाशी आणि त्याबाबतची सर्व प्रक्रिया भाजपचे सरकार असताना झाली होती. मग भाजपने याकूबचे प्रेत दफन करायला परवानगी का दिली, असा सवालही अंधारे यांनी भाजपला केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.