राज्यात बोगस फिजिओथेरपिस्टचा सुळसुळाट! कसे ओळखाल पात्र फिजिओथेरपिस्ट

177

कोरोना काळानंतर फिजिओथेरपीची मागणी वाढली आहे. कोरोनातून ब-याच काळानंतर विश्रांती घेणा-या रुग्णांना बरे होण्यासाठी डॉक्टरांनी फिजिओथेअरपीचा सल्ला दिला होता. या काळात रुग्णांच्या घरी भेट देत जास्त पैसे आकारल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या. फिजिओथेअरपीची वाढती मागणी लक्षात घेत घरगुती भेट देणारे बोगस फिजिओथेरपिस्ट तसेच रुग्णालयात रुग्णसेवा देणा-या बोगस फिजिओथेरपिस्टची माहिती परिषदेला कळवण्याचे आवाहनही कऱण्यात आले आहे.

गुरुवारी जागतिक फिजिओथेअरपी दिवस असल्याने परिषदेने या विषयावर रुग्णांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळाचे पदविधारकांनाही स्वतंत्र फिजिओथेअरपीचा व्यवसाय करण्यास मर्यादा असल्याचेही परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. या पदविकाधारकांनाच रुग्णालयात फिजिओथेअरपीसाठी नियुक्त केले जात असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे.

(हेही वाचा – CAA ला आव्हान देणाऱ्या 200 हून अधिक याचिकांवर सोमवारी सुनावणी)

भरमसाठ पैसा कमावण्याच्या नादात कायदेशीररित्या फिजिओथेअरपीची सेवा देऊ न शकणा-या पदविकाधारकांना रुग्णसेवा देणे धोक्याचे ठरेल, अशी भीतीही काही नोंदणीकृत फिजिओथेरपिस्टने व्यक्त केली. रुग्णाच्या शरीराची हालचाल पुन्हा योग्य पद्धतीने सुरु करण्यासाठी तसेच कित्येकदा शस्त्रक्रियेनंतर मशीनच्या माध्यमातून शरीराला आराम देत योग्य पद्धतीने व्यायाम मिळण्यासाठी रुग्णाला फिजिओथेअरपी घ्यावी लागते. मात्र फिजिओथेअरपीचे तांत्रिक आणि अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण घ्यावे लागते. यासाठी इच्छुकांनी किमान साडेचार वर्ष ते नऊ वर्षापर्यंतचा कोर्स घेणे अपेक्षित आहे, अशी माहिती फिजिओथेरपी असोसिएशनचे डॉ आनंद मिश्रा यांनी सांगितले.

बोगस फिजिओथेरपिस्टचा सुळसुळाट

परिषदेच्या माहितीरप्रमाणे फिजिओथेअरपीचे तंत्रशुद्ध शिक्षण नसलेले बोगस फिजिओथेरपिस्ट रुग्णालयातही फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहे.

कायदेशीर फिजिओथेरपिस्ट कसे ओळखाल?

महाराष्ट्र कायदा २००४ (२) नुसार, नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट खेरीत कोणतीही व्यक्ती फिजिओथेअरपीचा व्यवसाय करु शकत नाही. परिषदेकडे नोंदणी असललेल्या व्यक्तीलाच कायदेशीर आणि नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट म्हणून ग्राह्य धरले जाते.

फिजिओथेअरपी उपचार करण्यास पात्र नसलेले उमेदवार किंवा अभ्यासक्रम

० व्यावसायिक विज्ञान शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ व्होकेशनल सायन्स इन फिजिओथेअरपी) चे शिक्षण घेतलेले विद्यार्थी
० भारत समाजसेवक संस्थेच्यावतीने देण्यात आलेली पदविका
० भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही प्राधिकरण किंवा संस्थेच्यावतीने दिलेली पदविका
० बॅचलर ऑफ नॅच्युरोपॅथी आणि योगिक सायन्स
० आहार विशेषज्ञ, स्वास्थ्य प्रशिक्षक, पुनर्वसन कार्यकर्ता
० इतर कोणतेही थेअरपिस्ट

कोणाला फिजिओथेअरपीचा व्यवसाय करण्याची परवानगी नाही

महाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळाच्यावतीने दिला जाणारा डिप्लोमा इन फिजिओथेरपिस्ट आणि अंध फिजिओथेअरपी डिप्लोमाचे विद्यार्थी स्वतंत्रपणे फिजिओथेअरपीचा व्यवसाय करु शकत नाही.

नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट यांच्या देखरेखीखाली संबंधित पदविका धारक विद्यार्थी केवळ तांत्रिक साहाय्यक म्हणून काम करु शकतात.

फिजिओथेअरपी उपचाराचे नियोजन व प्रत्यक्षात रुग्णसेवा देण्याचे काम नोंदणीकृत फिजिओथेरपिस्टचे काम आहे. व्यवसाय मंडळाचे पदविका धारक या कामासाठी प्रशिक्षित नाहीत. ते कायद्याने पात्र नाहीत.

परिषदेचे आवाहन

संबंधित पदविकाधारक फिजिओथेअरपीचा स्वतंत्र व्यवसाय करत असतील किंवा रुग्णालय त्यांची फिजिओथेअरपीस्टम्हणून नियुक्ती करत असेल तर परिषदेला तक्रार करावी,

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.