एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना घेऊन सरकार स्थापन केल्यानंतर, अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामिल होत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील साता-यात शिंदे गटाचे बळ अधिक वाढले आहे. साता-यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे बळ आता अधिक वाढले आहे. साता-यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे साता-यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. साता-यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरची आव्हाने आता वाढली आहेत.
साता-यात ठाकरेंना धक्का
शिवसेनेचे साता-यातील युवा नेते आणि युवासेना जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रणजित सिंह भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.
( हेही वाचा: सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुशासन नियमावली तयार करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश )
Join Our WhatsApp Community