आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठी तेजी दिसून आली. बाजाराच्या कामकाजाला सुरुवात होताच सेन्सेक्समध्ये 357.53 अंकांची वाढ होऊन सेन्सेक्स 60 हजार 45 अंकांवर ओपन झाला. शेअर बाजारात शुक्रवारी खरेदीचा जोर कायम असल्यामुळे बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
(हेही वाचा – सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त गाडीचा किती होता वेग? मर्सिडीजने दिली माहिती)
यावेळी बँक निफ्टीने 40,500 अंकांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सने बाजार सुरू होताच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. त्यानंतर काहीशी घसरण झाली. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 357.53 अंकांनी वधारत 60,045 अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी 124.60 अंकांनी वधारत 17,923 अंकांवर खुला झाला. सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर निर्देशांकात विक्रीमुळे घसरण झाली. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 260 अंकांच्या तेजीसह 59,948.78 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 91 अंकांच्या तेजीसह 17,890.10 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समध्ये हे शेअर तेजीत
सेन्सेक्समधील 30 पैकी 28 समभाग वाढीसह व्यवहार करत आहेत. ज्यामध्ये भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ओएनसीजी, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे. यासह सन फार्मा, डॉ. रेड्डी लॅब्स, टायटन, आयटीसी, मारूती, एम अँड एम, एल अँड टी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिसचे समभागही वधारले आहेत.
Join Our WhatsApp Community