राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
राज्यपाल कोश्यारी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना गणेशाची मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच उद्योगपती गौतम हरी सिंघानिया उपस्थित होते. तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.
( हेही वाचा: महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरे म्हणाले “एक युग होतं, ते संपलं. आता…” )
Join Our WhatsApp Community