ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी गुरूवारी रात्री निधन झालं. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून उपचार करण्यात आले, मात्र त्यांना अपयश आल्याने त्यांचे निधन झाले.
(हेही वाचा – ‘त्यांना माझ्यामुळे पुण्य मिळतंय’, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे आणि विरोधकांना टोला)
एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतानेही दुःख व्यक्त केले आहे. भारताने एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
Queen Elizabeth II death: India declares one-day mourning on Sept 11
Read @ANI Story | https://t.co/76Y7WjDQad#QueenElizabeth #QueenElizabethII #Queen #StateMourning #UK pic.twitter.com/txIwFECF4F
— ANI Digital (@ani_digital) September 9, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ गेल्या वर्षापासून एपिसोडिक मोबिलिटीच्या समस्येने त्रासल्या होत्या. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या राणी होत्या त्यांनी सर्वाधिक काळ राज्य केले होते. यूके रॉयल फॅमिलिच्या ट्विटरवर गुरूवारी रात्री अशी माहिती दिली गेली की, जगातील सर्वात वृद्ध महाराणी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे. यानंतर त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स हा देशाचा नवा राजा घोषित करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरे म्हणाले “एक युग होतं, ते संपलं आता…”)
Join Our WhatsApp Community