पक्षातून बाहेर पडत ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यानंतर आझाद हे स्वतःचा पक्ष स्थापन करुन जम्मू-काश्मीरमध्ये आपली ताकद सिद्ध करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आझाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मी त्यांना नष्ट केले
काँग्रेस नेत्यांनी माझ्यावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना मी फक्त साध्या 303 रायफलने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना नष्ट केले. पण मी जर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते तर मग काँग्रेस अजिबात दिसलीच नसती, असा हल्लाही आझाद यांनी काँग्रेसवर चढवला आहे. जम्मू-काश्मीर येथील एका जाहीर सभेत गुलाम नबी आझाद बालोत होते.
(हेही वाचाः ‘हे खपवून घेणार नाही’, मुख्यमंत्री शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया! काय आहे कारण?)
पक्षबांधणीला सुरुवात
दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गुलाम नबी आझाद हे आपल्या नव्या पक्षाच्या बांधणीसाठी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय झाले आहेत. कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी आझाद हे जम्मू-काश्मीरमध्ये कामाला लागले असून आपले कार्यक्षेत्र असलेल्या भदरवाह येथे ते गुरुवारी बोलेत होते. मी गेली 52 वर्षे काँग्रेसचा सदस्य होतो आणि राजीव गांधींना भाऊ तर इंदिरा गांधींना माझी आई मानतो. त्यामुळे त्यांच्याबाबत मी काहीही बोलणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community