राज्यात दोन वर्षांनी ठिकठिकाणी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्व राजकीय नेत्यांनी गणेश दर्शनाच्या माध्यमातून विविध मंडळांना भेटी दिल्या तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे ट्वीट सुद्धा अनेक नेत्यांनी केले. यातच मोहित कंबोज यांनी सुद्धा एक नवे ट्वीट केले आहे. मोहित कंबोज यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या थेट निशाणा साधला आहे. शनिवारी सकाळी मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकके यांनी यावेळी गणेशोत्सव असो किंवा दहिहंडी दोन्ही सणांच्या शुभेच्छा जनतेल्या दिल्या नाहीत याची आठवण कंबोज यांनी ट्वीट करत ठाकरेंना करून दिली आहे.
( हेही वाचा : लालबागच्या मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल ५० फोन, दागिने लंपास)
काय म्हणाले मोहित कंबोज ?
अडीच वर्षांनंतर हिंदूंनी दोन्ही सण ज्या उत्साहात साजरे केले त्याबद्दल कंबोज यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे हर हर महादेव म्हणत आभार मानले तसेच , श्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी “राज्याच्या १२ कोटी जनतेले ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहिहंडीच्या शुभेच्छा दिल्या” असे ट्वीट मोहित कंबोज यांनी केले आहे.
श्री उद्धव ठाकरे @OfficeofUT जी ने इस साल 12 Crore महाराष्ट्र के लोगों को ना ही गणेशोत्सव की बधाई दी ना ही दही हांडी उत्सव की !
2.5 साल के बाद हिन्दुओं ने जो उत्साह से दोनो त्योहार मनाया हैं उसके लिए @mieknathshinde जी और @Dev_Fadnavis जी को दिल से धन्यवाद !
हर हर महादेव !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) September 10, 2022
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात सोशल मिडीयावर सक्रिय होते परंतु सत्तांतर झाल्यावर त्यांना हिंदू सणांचा विसर पडला आहे.
लगता है कि हिंदुत्व के आगे याकूूब मेमन परिवार का दबाव ज्यादा था,
शायद इसी वजह से कब्र को मजार बनाने में तो दिल खोलकर मदद की लेकिन गणपति बप्पा आगमन की खुशी या उनके विसर्जन को लेकर एक ट्वीट तक नहीं किया,तभी तो जनता कह रही है
इधर- गणपति बप्पा मोरया,
उधर- याकूूब से प्यार होरया !— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) September 10, 2022
“हिंदुत्वाच्यासमोर याकूब मेननच्या परिवाराचा दबाव अधिक आहे. यामुळेच त्याच्या कबरीच्या उदात्तीकरणाला मदत केली पण गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या किंवा विसर्जनाच्या शुभेच्छांचे ट्वीट केले नाही इधर – गणपती बाप्पा मोरया, उधर – याकूब से प्यार होरया” अशी खोचक ट्वीट करत मोहित कंबोज यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community