भारतीय नौदलात तारागिरी युद्धनौका दाखल होणार आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे येत्या रविवारी प्रकल्प 17 ए मधील तिसरी युद्धनौका – तारागिरीचे जलावतरण करण्यात येणार आहे. एकात्मिक बांधणी पद्धत वापरून ही युद्धनौका बांधण्यात आली आहे.
अत्याधुनिक वैशिष्ट्ये
तारागिरीची पायाभरणी 10 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली होती आणि ऑगस्ट 2025 पर्यंत ती नौदलाकडे सुपूर्द होणे अपेक्षित आहे. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने केले आहे. युद्धनौका पर्यवेक्षण पथकाच्या (मुंबई) देखरेखीखाली एमडीएल विस्तृत आरेखन आणि बांधणी करत आहेएकूण 149.02 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद असलेली ही युद्धनौका ,दोन गॅस टर्बाइन्स आणि 02 मुख्य डिझेल इंजिनांच्या सीओडीओजी संयोजनाद्वारे चालवली जात असून त्याचे आरेखन, सुमारे 6670 टन वजन घेऊन स्थानांतर करताना 28 नॉट्सपेक्षा जास्त वेग प्राप्त करण्याच्या दृष्टीने केलेले आहे. प्रकल्प 17ए अंतर्गत युद्धनौकेच्या मुख्य भागाच्या बांधणीत वापरलेले पोलाद हे स्वदेशी विकसित डीएमआर 249 ए असून ते भारतीय पोलाद प्राधिकरणाने उत्पादित केलेले लो कार्बन मायक्रो अलॉय ग्रेड पोलाद आहे. स्वदेशी बनावटीच्या या स्टेल्थ युद्धनौकेमध्ये अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती प्रणाली, एकात्मिक मंच व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्युलर लिव्हिंग स्पेस, अत्याधुनिक वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असतील.या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी स्वनातीत क्षेपणास्त्र प्रणाली बसवली जाणार आहे.
( हेही वाचा : ना दहिहंडीच्या शुभेच्छा, ना गणेशोत्सवाच्या; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र! )
शत्रूची विमाने आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली युद्धनौकेची हवाई संरक्षण क्षमता, व्हर्टिकल लॉन्च म्हणजेच हवेत मारा करणाऱ्या आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीवर आधारित आहे. दोन 30 मिमी रॅपिड फायर गन युद्धनौकेला सर्व बाजूनी संरक्षण क्षमता प्रदान करतील तर एक एसआरजीएम गन युद्धनौकेत नौदलाच्या प्रभावी भडिमाराला पाठबळ देईल. स्वदेशी बनावटीचे ट्रिपल ट्यूब वजनाला हलके पाणतीर लाँचर्स आणि रॉकेट लाँचर्स युद्धनौकेच्या पाणबुडीविरोधी क्षमतेत भर घालतील.
Join Our WhatsApp Community