बेवारस मुलीचे पोलिसांनी स्वीकारले पालकत्व; ‘एमएचबीची पोलीस बेटी’ अशी दिली ओळख

136

बेवारस अवस्थेत सापडलेल्या एक दिवसाच्या मुलीला पोलिसांनी जीवनदान दिले आहे, एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी या चिमुरडीचे पालकत्व स्वीकारून तिच्या पालनपोषणापासून तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च स्वीकारत मुंबई पोलिसांनी माणुसकीचे खरे दर्शन घडवले आहे. या चिमुरडीला पोलिसांनी ‘एमएचबीची पोलीस बेटी’ अशी ओळख दिली आहे.

( हेही वाचा : Yakub Memon: मेमनच्या कथित नातेवाईकांसोबत किशोरी पेडणेकरांचा व्हिडिओ व्हायरल; आरोप – प्रत्यारोप सुरु )

बोरिवली पश्चिमेतील शिवाजी नगर परिसरातील रिक्षा स्टँडजवळ एक दिवसाचे बाळ कोणीतरी ठेवून गेल्याचा कॉल ५ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. नियंत्रण कक्षाने या कॉलची सूचना एमएचबी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या टॉवेलमध्ये गुंडाळलेले रक्ताने माखलेले स्त्री जातीचे एक दिवसाचे जिवंत बाळ सापडले. आले, त्याची नाळ देखील तशीच होती. पोलिसांनी तात्काळ त्या चिमुरडीला ताब्यात घेऊन तात्काळ कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी चिमुरडीची नाळ वेगळी करून तिच्या तपासण्या करण्यात आल्या असता ती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगून तिला दाखल करून घेतले. मुलीला असे रस्त्यावर सोडून देणाऱ्या मातेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलीस बनले पालक…

कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आलेल्या या चिमुरडीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एमएचबी पोलीस ठाण्यातील महिला सहायक पोलिस उपनिरीक्षक शोभा यादव आणि पीएसआय वनिता काटबाने, सहायत पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार हे वरचेवर येऊ लागले व तिच्या प्रकृतीची चौकशी करून तिला हवं नको ते बघू लागले. एका दिवसांतच या चिमुरडीचा पोलिसांना लळा लागला. पोलिसांनी तिला ‘एमएचबी ची पोलीस बेटी’ अशी ओळख दिली आहे. लवकरच तिला शोभेल असे गोंडस नाव देऊन तिचे बारसं करण्यात येईल असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांना या मुलीचा एवढा लळा लागला की, पोलिसांनी तिचे पालकतत्व स्वीकारण्याचा निर्णय घेऊन सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची परवानगी घेत तिचे पालनपोषण करण्याचा तिला हवं नको ते बघण्याची जबाबदारी एमएचबी पोलिसांनी घेतली आहे. पोलीस बेटीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च पोलीस करणार असून तिच्या पुढच्या भविष्यासाठी एमएचबी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी जबाबदारी घेत, पोलिसांनी क्राउडफंडिंग सुरू केले आहे आणि ती रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाईल जेणेकरून तिला भविष्यात पैशासाठी त्रास सहन करावा लागणार नाही असे पोलिसांनी सांगितले.

एमएचबी पोलीस बेटीला सुविधा असणाऱ्या खाजगी बालआश्रमात ठेवण्यात येणार असून एमएचबी पोलिसांकडून तिची काळजी घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी म्हटले आहे. तसेच तिच्या मातापित्याच्या शोध घेण्यासाठी एक पथक नेमण्यात आलेले चिमुरडी ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत का त्याची पाहणी करून तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.