गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीवर एनसीसीच्या युवकांनी राबवली स्वच्छता मोहीम

177

गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगांव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्मल्यांची आणि इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आणि इतर असे 400 सभासद एन.सी.सी. मधील १२०० मुले-मुली आणि ६० एनसीसीचे अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

ncc2

एनसीसीच्या युवकांचे कौतुक 

गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर निर्माल्याचा कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. एनसीसीच्या युवकांनी स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ केला. यावेळी मंत्री गिरिश महाजन यांनी राष्ट्र उभारणीत एनसीसी कॅडेट्सच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. एनसीसीच्या मुलांनी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्यावरणासाठी सामाजिक जबाबदारीचे भान राखले पाहिजे, असे सांगत एनसीसी प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजा लवकरच पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. यावेळी एनसीसीच्या ग्रुप कॅप्टन निलेश देखणे म्हणाले की, गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम एनसीसीचे युवक २०१९पासून राबवतात. एनसीसीच्या युवक समाजसेवेसाठी कायम तत्पर असतात.

ncc

(हेही वाचा Yakub Memon Controversy: दोन वर्षांपासून तक्रारीवर कारवाई नाही, दहशतवादी मेमनला कोणाचे वरदान?)

ncc4

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.