भारत जोडो यात्रेसाठी राहूल गांधींचा 41,000 रुपयांचा टी-शर्ट

180

काॅंग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्टवरुन भाजपने टीकास्त्र डागले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान शुक्रवारी राहुल गांधी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित करताना, चक्क 41,257 रुपयांचा टी-शर्ट घातला होता, असा दावा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहूल गांधी यांना सणसणीत टोला लगावला आहे.

“1971 साली राहुलजींच्या आजीने गरिबी हटावचा नारा दिला होता. देशाची गरिबी हटली की नाही माहिती नाही’, पण राहुलजींची मात्र नक्की हटली,” असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.

( हेही वाचा: Yakub Memon Controversy: दोन वर्षांपासून तक्रारीवर कारवाई नाही, दहशतवादी मेमनला कोणाचे वरदान? )

भाजपचे ट्वीट 

भाजपने आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन राहुल गांधी यांच्या टी-शर्टची किंमत सांगितली आहे. राहुल गांधी यांचा टी-शर्ट घातलेला एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत बाजूला तशाच टी-शर्टचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच, तो टी-शर्ट कोणत्या ब्रॅंडचा आहे आणि त्या टी-शर्टची किंमत किती आहे हे सुद्धा त्यात लिहिले आहे.

काॅंग्रेसची भारत जोडो यात्रा

काॅंग्रेसची भारत जोडो यात्रा दिवसभरात सरासरी 22 ते 23 किलोमीटर असणार आहे. हा प्रवास दररोज सकाळी 7 वाजता सुरु होणार असून 10 वाजेपर्यंत चालणार आहे. यानंतर काही तासांच्या विश्रांतीनंतर हा प्रवास दिवसाच्या उत्तरार्धात दुपारी 3:30 वाजता सुरु होईल, जो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरु झालेला 3570 किमी लांबीचा हा प्रवास पाच महिने चालणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.