येत्या २६ सप्टेंबरपासून बेस्ट प्रवाशांना लक्झरी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. बेस्टच्या प्रवाशांना मोबाईल अॅपवर तिकीट बुकिंग केल्यावर प्रिमियम बसमध्ये आरक्षित सीट मिळणार आहे.
( हेही वाचा : प्रभादेवीत बेस्ट सबस्टेशनला आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल)
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून दररोज ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाअधिक सुविधा उपलब्ध करत प्रवाशांना गारेगार प्रवास करता यावा यासाठी वातानुकूलित बसेस बेस्टने प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. यामुळ प्रवाशांना आधीच तिकीट बुक करून लक्झरी प्रवासाचा आनंद घेता येईल.
२६ सप्टेंबरपासून सेवेत
२ हजार लक्झरी बेससचा ताफा बेस्ट उपक्रमामध्ये सामील होणार असून पहिल्या टप्प्यात २०० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. २६ सप्टेंबरपासून या लक्झरी प्रिमियम बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावतील अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.
या सगळ्या बसेस वातानुकूलित असून बसमध्ये तिकीट आरक्षणाती सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी खास अॅप तयार केले जाणार असून, यात सीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बस कुठे आहे याचा ट्रॅक सुद्धा प्रवासी घेऊ शकतात. बसमध्ये किती गर्दी आहे याचीही माहिती मिळेल.
या मार्गावर प्रिमियम सेवा
सीएसएमटी, नरिमन पॉइंट, ठाणे, मिरा रोड, बीकेसी, पवई, लोअर परळ या मार्गावर या बसेस उपलब्ध असतील. या प्रिमियम बसचे तिकीट सर्वसाधारण व वातानुकूलित बसेसपेक्षा अधिक असेल मात्र ओला, उबेरपेक्षा स्वस्त असेल.
लक्झरी बसची वैशिष्ट्ये
- सीसीटीव्ही कॅमेरे
- पुश बॅक सिट्स
- सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा
- वातानुकूलित बस