मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई करत तब्ब्ल 12 किलो सोनं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या सोन्याची किंमत 5.38 कोटी रुपये आहे. यावेळी कस्टम विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकासह सहा जणांना अटक केली.
(हेही वाचा – राणे म्हणतात फडणवीस हिंदुहृदयसम्राट, पण आशिष शेलारांचे मत काय?)
खास डिझाईन केलेल्या बेल्टमधून सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न कारण्यात आला होता. मात्र, विमानतळावरील कस्टम विभागाच्या कारवाईमुळे सोनं जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका सुदानी नागरिकाला अटक करण्यात आली. यावेळी काही प्रवाशांनी त्याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी गोंधळ घातला. मात्र, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी सोने तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकासह सहा जणांना अटक केली.
एका कस्टम अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सीमाशुल्क कायद्याच्या कलम ११० अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात सोन्याच्या तस्करीचा गुन्हा केला. मुंबई विमानतळावर उत्तर आफ्रिकेकडील देश सुदान येथील नागरिकाकडून १२ किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. या नागरिकाला इतर पाच जणांना सुरक्षा यंत्रणांपासून वाचत सोनं तस्करी करण्यास मदत केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community