मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन गणपतीचं दर्शन घेत होते, यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. आपली मानसिकता कशी असते पहा, ज्यावेळी नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते त्यावेळी एक बातमी छापून आली होती, बातमी गंमतीशीर आहे. पण त्यातून आपली मानसिकता लक्षात येते. ’मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारी बाबू वेळेवर कामाला येऊ लागले’ अशाप्रकारची ही बातमी होती. म्हणजे याआधी बाबू लोक कामचोरी करायचे. कामचोर आणि भ्रष्टाचाराची एक परंपरा निर्माण झाली होती.
आता महाराष्ट्राविषयी बोलू. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शासकीय वातावरणात एक शिस्त होती. गुंडगिरी कमी झाली. कोणत्याही गोष्टीचा समूळ नायनाट होत नाही. त्यानंतर फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे स्वतः त्या खुर्चीवर जाऊन बसले. राजकारणाच्या दृष्टीने ही साधी बाब होती. उद्धव ठाकरेंनी जे केलं, ते पहिल्यांदाच घडलं नव्हतं. पण ज्या खुर्चीसाठी तुम्ही इतका आटापिटा करता, ती खुर्ची मिळवल्यानंतर त्या खुर्चीला शोभेल अशी कामगिरी केली पाहिजे.
ही एक संस्कृती
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे पण त्या खुर्चीला शोभेल असं वर्तन त्यांना का कुणास ठाऊक करता आलं नाही. ते मंत्रालयातही काही वेळाच गेले, आपल्या घराचा उंबरा ओलांडला नाही. असा मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला. पण प्रसारमाध्यमांनी काम न करणार्या मुख्यमंत्र्याला इतकं मोठं केलं होतं की ती एक संस्कृती निर्माण झाली होती. काम न करण्याची संस्कृती. म्हणून काम न करणार्या उद्धव ठाकरे यांची आठवण आजही मीडियाला होत असते.
शिंदेच बेस्ट सीएम
एकनाथ शिंदे मंत्रालयात जातात, लोकांच्या घरात जातात हे मीडियाला आता बघवत नाही. त्यांची इच्छा आहे की शिंदेंनी देखील घरात बसून वेळ घालवावा आणि ऑनलाइन राज्य चालवावं. त्यामुळे शिंदे लोकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत होते, ही गोष्ट त्यांना खटकते. म्हणजे ज्याचा अभिमान बाळगावा त्याची लाज वाटते आणि ज्याची लाज वाटावी ते अभिमानास्पद वाटतं. दर्शन घेणारे मुख्यमंत्री नकोसे वाटतात आणि कोणालाच दर्शन न देणारे मुख्यमंत्री बेस्ट सीएम वाटतात.
Join Our WhatsApp Community