गणपतीच्या आगमनासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आता या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, सोमवारी राज्यात केवळ पाच हजारांपर्यंत रुग्णसंख्या खाली येईल, असा अंदाज आहे. रविवारच्या नोंदीत राज्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.१० टक्क्यांवर पोहोचली आहे.
रुग्णसंख्येत सातत्याने घट
गणपती आगमनाच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्टला राज्यात १० हजार ६३३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९८.०४ टक्क्यांवर दिसून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत होणारी घट सातत्याने दिसून आली. दीड हजारांवर दर दिवसाला नव्याने कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली जात होती.
(हेही वाचाः अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद, पीडित तरुणीचे बळजबरीने लावले लग्न)
हळूहळू दरदिवसाला नव्या कोरोना रुग्णांची संख्या तीन आकड्यांवर दिसून आली. रविवारी ११ सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या आकडेवारीत राज्यात केवळ ७०१ नवे कोरोना रुग्ण दिसून आले. गेल्या २४ तासांतील रुग्ण बरे होण्याची संख्या १ हजार ५६ वर पोहोचली. आता राज्यात केवळ ६ हजार २२० कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या
पुणे – १ हजार ३७०
मुंबई – १ हजार ७११
ठाणे – १ हजार ४३७
रायगड – ३३७
नाशिक – १७४
नागपूर – १२७