मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातून स्वच्छतागृहाची खिडकी आणि ग्रील तोडून सहा मुली पळाल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 11 सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली.
धक्कादायक बाब म्हणजे, या अल्पवयीन मुलींनी पळून जाण्यापूर्वी गार्ड काॅन्स्टेबलच्या खोलीचे गेट बाहेरुन बंद केले होते. याचे कारण म्हणजे, या मुलींच्या पलायनाची माहिती काॅन्स्टेबलला मिळाली असती तर त्या मुलींचा पाठलाग करत त्यांना पकडले असते.
( हेही वाचा: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड; येथे करा अर्ज )
मुंबई पोलिासांना दिली माहिती
6 मुली पळून गेल्याची बातमी जेव्हा मुलींच्या वसतिगृहाच्या अधिका-यांना समजली तेव्हा त्यांनी या घटनेचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. वसतिगृहातील रेकाॅर्डनुसार नेमक्या कोणत्या मुली पळाल्या हे समजण्यास मदत झाली. अधिका-यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गोवंडी पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असून, संबंधित मुलींचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विविध तपास यंत्रणांकडून मानवी तस्करी, भिकारी अशा बेकायदेशीर काम करणा-यांवर कारवाई करण्यात येते आणि तेथे सापडलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांना गोवंडीच्या वसतिगृहात ठेवले जाते. मुलींच्या पलायनामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Join Our WhatsApp Community