कलम 370 च्या पुनर्स्थापनेबाबत लोकांची दिशाभूल करणार नाही. कारण, संसदेत दोन तृतीयांश बहुमत असलेले सरकारच 370 ची पुनर्स्थापना करु शकते, असे काॅंग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. बारामुल्ला येथे काढलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते.
आझाद हे नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या महिन्यात काॅंग्रेस पक्ष सोडल्यानंतर आझाद यांनी काश्मीर खो-यात काढलेली ही पहिलीच रॅली होती. ते म्हणाले की, मी किंवा काॅंग्रेस पक्ष किंवा तीन प्रादेशिक पक्ष तुम्हाला कलम 370 परत देऊ शकत नाहीत. तृणमूलच्या अध्यक्ष ममत बॅनर्जी किंवा द्रुमक अथवा राष्ट्रवादीचे शरद पवार हे 370 परत देऊ शकत नाहीत.
( हेही वाचा: 15 सप्टेंबरपासून कोकण रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस धावणार विद्युत वेगाने )
लोकसभेत काॅंग्रेसला जास्त जागा मिळणार नाहीत
आझाद म्हणाले की, काॅंग्रेस पक्ष गेल्या दहा वर्षांत लोकसभेच्या 85 पेक्षा जास्ता जागा मिळवू शकला नाही. लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे मला वाटत नाही. राज्यसभेत त्यांची ताकद कमी होत आहे, असेही आझाद यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community