मुसळधार पावसात कात्रज येथील प्राणी संग्रहालयात 25 पर्यटक अडकले

133

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले. सायंकाळच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. याच मुसळधार पावसामुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 25 ते 30 पर्यटक अडकून पडले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने एका ब्लॉकमध्ये हे सर्व पर्यटक अडकून पडले होते. मात्र, त्यानंतर या पर्यटकांना बाहेर काढण्यात आले.

सायंकाळच्या सुमारास राजीव गांधी प्राणी संग्रहालयात हे पर्यटक पर्यटनासाठी आले होते. त्यानंतर अचानक पावसाला सुरुवात झाली आणि हे सर्व पर्यटक अडकून पडले. पर्यटकांपैकीच एकाने मनसेचे नेते वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानंतर या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात आले.

( हेही वाचा: 15 सप्टेंबरपासून कोकण रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस धावणार विद्युत वेगाने )

पुण्यात ढगफुटी

पुणे शहर आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे कोथरुड, धनकवडी परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्ष जुने वडाचे झाड कोसळले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.