पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पुणेकरांना चांगलेच झोडपून काढले. पुणेकरांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्लोगल्लीत पाणी साचले. अनेक घरात या पावसाचे पाणी शिरले. तर यामुळे वाहने देखील वाहून गेले. याशिवाय ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडीदेखील झाली पाहायला मिळाली.
पुण्यातील सोमेश्वर वाडी, पाषाण, वानवडी, चंदननगर, वेदभवन, कोथरूड, बी.टी. कवडे रोड, कात्रज उद्यान या परिसरात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तर कोंढवा, साळुंखे विहार, पाषाण यासारख्या परिसरात झाडे पडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील कात्रज ते नवले ब्रिज या मार्गावर मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
( हेही वाचा: अंबरनाथमध्ये एका घराची भिंत दुस-या घरावर कोसळली; 2 जण गंभीर जखमी )
अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर वाहनांची रांगच रांग लागली. वाहनांच्या या गर्दीतून जाताना एका ॲम्बुलन्सला मोठी कसरत करावी लागली. दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पुण्यात पाऊस सुरू झाला. तर शहरातील कात्रज आणि धनकवडी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने आंबील ओढयाला पूर आला त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले.
Join Our WhatsApp Community