राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत झाले. राष्ट्रवादीच्या या अधिवेशनात अजीम-ओ-शान शहंशाह हे गाणं लावण्यात आलं होतं. आता अधिवेशनात लावण्यात आलेल्या या गाण्यावरुन भाजपने राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचे आणि गुणगान मात्र शहंशाहचे, असा टोला भाजपने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजीम-ओ-शान शहंशाह हे गाणं लावलं होतं, आता यावर भाजपने ट्वीट करत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. दिल्लीमधील शहंशाह हीच खरी ओळख आहे, शरद पवार यांची. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचे आणि गुणगान मात्र शहंशाहचे, असे ट्वीट महाराष्ट्र भाजपने केले आहे.
( हेही वाचा: आशिष शेलारांवर भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी; मुंबईची धुरा कुणाकडे? )
मरहबा जनाब @PawarSpeaks साहब!
अज़ीम-ओ-शान शहंशाह
फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे।दिल्लीमधली 'शहंशाह' हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे.
राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे? pic.twitter.com/UUYBEQRyXP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 11, 2022
पवारांची मोदी सरकारवर टीका
दिल्लीत झालेल्या अधिवेशनात पु्न्हा एकदा शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात, तर त्यांनी स्वाभिमानाचा परिचय दिला आहे. आज आपण एका ऐतिहासिक मैदानात दिल्लीच्या तालकटोरा मैदानात जमलेलो आहोत. याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिले होते. मला आनंद आहे की, दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिले गेले होते, त्या ठिकाणी आज आपले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community