“… तर उदय सामंत यांना जाळून टाकू!” पोलिसांसमोरच ठार मारण्याची धमकी; रत्नागिरीत खळबळ

164

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण चांगलेच तापले असताना रिफायनरीत्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला काही लोकांचा विरोध होतोय तर काही लोकांचे समर्थन आहे. या प्रकल्पाला या रिफायनरी प्रकल्पाचे विरोधक नरेंद्र जोशी यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी दिली आहे.

(हेही वाचा – आशिष शेलारांवर भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी; मुंबईची धुरा कुणाकडे?)

“रिफायनरी प्रकल्प झाला तर उदय सामंत यांना जाळून टाकू”, असे म्हणत नरेंद्र जोशी यांनी उदय सामंत यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उदय सामंत तक्रार करणार असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रविवारी झालेल्या राजापुरातील सभेमध्ये ही घटना घडली आहे. या धमकीमुळे रत्नागिरीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

उदय सामंतांच्या विरोधात रिफायनरीचे विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातील जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. रिफायनरी प्रकल्पाचे विरोधक नरेंद्र जोशी यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणात कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील लक्ष घातले असून घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी आमदार सामंत यांच्यासह चर्चा केली. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.