Make in India! कोरोनानंतर आता लम्पी व्हायरसवरही स्वदेशी लस

211

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने अनेक पाऊलं उचलली जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतात कोरोना व्हायरसने कहर केला होता. यादरम्यान, कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस तयार केली होती. या कोरोनावर मात करणाऱ्या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लम्पी या व्हायरसवर लस निर्माण करण्यास भारतीय शास्त्रज्ञांना मोठे यश आले आहे. लम्पी या आजारावर भारतात स्वदेशी लस विकसित केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेअरी समिटच्या उद्धाटनावेळी बोलत होते.

(हेही वाचा – “… तर उदय सामंत यांना जाळून टाकू!” पोलिसांसमोरच ठार मारण्याची धमकी; रत्नागिरीत खळबळ )

गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतातील अनेक राज्यात लम्पी व्हायरसमुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र आता काही काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी या आजारासाठी स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे. यावेळी त्यांनी देशातील प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावरही भर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोदींनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, २०२५ पर्यंत १०० टक्के प्राण्यांना फुट अँड माउथ डिजीज आणि ब्रुसलॉसिसच्या विरोधातील लस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.

काय आहे लम्पी रोग ?

लम्पी त्वचा रोग (एलएसडी) हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जो गुरांना प्रभावित करतो. त्यामुळे जनावरांच्या त्वचेवर ढेकूण बसतात, ताप येतो. या आजाराने जनावरांचाही मृत्यू होऊ शकतो. हा रोग डास, माश्यांमुळे पसरतो. याशिवाय दूषित अन्न आणि पाण्यामुळेही हा आजार पसरतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.