नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा

166

वांद्रे कुर्ला संकुल अर्थात BKC मध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस असल्यामुळे येथून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची खूप गर्दी असते. म्हणूनच २६ सप्टेंबरपासून बेस्ट उपक्रमाअंतर्गत BKC ते ठाणे या मार्गावर प्रिमियम बससेवा सुरू करण्यात येणार आहे. बेस्टच्या प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवर तिकीट बुकिंग केल्यावर प्रिमियम बसमध्ये आरक्षित सीट मिळणार आहे. २ हजार लक्झरी बेससचा ताफा बेस्ट उपक्रमामध्ये सामील होणार असून पहिल्या टप्प्यात २०० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या बससेवेचे दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत परंतु ओला-उबेर तसेच सामान्य टॅक्सीपेक्षा याचे दर तिकीट कमी असतील असे आश्वासन उपक्रमाकडून देण्यात आले आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ प्रवाशांना मिळणार ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा; वर्षभरात १ हजार दुचाकी सेवेत येणार )

आरामदायी प्रवास 

BKC ते ठाणे या मार्गावर प्रिमियम सेवा सुरू केल्यानंतर बेस्ट पवई ते दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई या मार्गावर बेस्टचा विस्तार करण्यात येईल. या सगळ्या बसेस वातानुकूलित असून बसमध्ये तिकीट आरक्षणाती सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी खास अ‍ॅप तयार केले जाणार असून, यात सीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बस कुठे आहे याचा ट्रॅक सुद्धा प्रवासी घेऊ शकतात. बसमध्ये किती गर्दी आहे याचीही माहिती मिळेल. प्रवास करताना तुम्ही आराम करू शकता आणि तुमचे लॅपटॉप, मोबाईल फोन सुद्धा चार्ज करू शकता. बेस्ट उपक्रम हे भारतात प्रिमियम सिटी बस सेवा सुरू करणारे पहिले परिवहन महामंडळ आहे असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

या मार्गावर धावणार 

सीएसएमटी, नरिमन पॉइंट, ठाणे, मिरा रोड, बीकेसी, पवई, लोअर परळ या मार्गावर या बसेस उपलब्ध असतील. या प्रिमियम बसचे तिकीट सर्वसाधारण व वातानुकूलित बसेसपेक्षा अधिक असेल मात्र ओला, उबेरपेक्षा स्वस्त असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.