सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. मात्र या यात्रेला सुरुवात होऊन ५ दिवस एक आठवडा होत नाही तोच या यात्रेवरून देशात एका मागोमाग एक वाद निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे केरळमध्ये वादग्रस्त पाद्री पोन्नीया यांच्याशी बोलताना पाद्री यांनी येशू हाच खरा देव आहे, असे वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतर आता या यात्रेच्या संबंधी काँग्रेसने ट्विट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश जळत असलेले ट्विट करून वाद निर्माण केला आहे. त्यावर भाजपाने ही यात्रा भारत जोडो यात्रा नाही तर आग लगाओ यात्रा आहे, असे सांगत काँग्रेसवर पलटवार केला आहे.
ये तस्वीर BJP और RSS को प्रतिनिधित्व करते हुए कांग्रेस ने ट्वीट किया और उसमें आग जलते हुए दिखाया है। कांग्रेस ने लोगों को उकसाने के लिए ये ट्वीट किया है। इनकी भारत जोड़ो यात्रा,आग लगाओ यात्रा है। ये पहली बार नहीं है जब कांग्रेस ने इस प्रकार की तस्वीर ट्वीट की हो: संबित पात्रा,BJP pic.twitter.com/OalwDq2mVZ
— ANI_HindiNews (@AHindinews) September 12, 2022
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसने एक ट्वीट जारी केले. काँग्रेसच्या यात्रेमुळे भाजपाला मोठे नुकसान भोगावे लागणार, असा इशारा दिला जातो. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील हाफ चड्डीचे एक छायाचित्र काँग्रेसने ट्विट केले आहे. या हाफचड्डीला आग लागल्याचे या ट्विटमध्ये दर्शवले आहे. तसेच आता फक्त 145 दिवस…असा इशाराही या ट्विटवर देण्यात आला आहे. या ट्विटवरून भाजपा नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू शकतात. उत्तर प्रदेशातील नेत्याने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे ट्विट काय?
भाजप आणि आरएसएसने देशाचे केलेले नुकसान आणि तिरस्काराच्या भावनेतून मुक्त करण्यासाठी काँग्रेस एक-एक पाऊल पुढे टाकतेय… असे म्हणत काँग्रेसने संघाच्या हाफ चड्डीचा फोटो ट्विट केला आहे.
To free the country from shackles of hate and undo the damage done by BJP-RSS.
Step by step, we will reach our goal.#BharatJodoYatra 🇮🇳 pic.twitter.com/MuoDZuCHJ2
— Congress (@INCIndia) September 12, 2022
उत्तर प्रदेश मंत्र्याचे ट्विट काय?
काँग्रेसच्या या ट्विटवर उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद यांची प्रतिक्रिया आली आहे. राजकीय मतभेद स्वाभाविक आणि समजण्याजोगे आहेत. मात्र राजकीय विरोधकांना जाळण्यासाठी अशा प्रकारची मानसिकता काय कामाची? नकारात्मकता आणि द्वेषाच्या राजकारणाची सर्वांनीच निंदा केली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
Political differences are natural and understandable but what sort of mindset calls for burning political opponents?
This politics of negativity and hate should be condemned by all. https://t.co/Lx91MRMkep— Jitin Prasada जितिन प्रसाद (@JitinPrasada) September 12, 2022
(हेही वाचा हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’?)
Join Our WhatsApp Community