व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर; शोधता येणार तारखेनुसार मेसेज

194

व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपचा जगभरातील लाखो युजर्स वापर करतात. त्यामुळे युजर्सना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप लवकरच काही नवे फिचर्स लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत व्हॉट्सअ‍ॅप युजर्स डेटद्वारे आपले मेसेज सर्च करू शकतील.

( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा )

डेट-टू-मेसेज

WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप TestFlight बीटा प्रोग्रामद्वारे हे अपडेट सबमिट केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप 22.19.0.73 या व्हर्जनमध्ये डेट-टू-मेसेज या सर्च फिचरवर काम करत आहे. WABetaInfo ने या फिचरला सर्च मेसेज बाय डेट (Search Message By Date) असे नाव दिले आहे. हे फिचर सध्या डेव्हलमेंट स्टेजवर आहे.

New Project 1 8

सध्या आपल्याला चॅटमधील पूर्वीचे मेसेज शोधताना सर्चमध्ये संबंधित शब्द टाकून मेसेज सर्च शोधावे लागते, परंतु या नव्या फिचरमध्ये असे होणार नाही. या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कॅलेंडरचे चिन्ह दिसेल. कॅलेंडर चिन्हाच्या मदतीने, वापरकर्ते त्वरीत एका विशिष्ट तारखेपर्यंत जाऊ शकतात जेणेकरून ते त्या तारखेपासून सर्व संदेश वाचण्यास मिळतील.

व्ह्यू वन्सचा मेसेजचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपने अलिकडेच व्ह्यू वन्सचा पर्याय दिला होता. परंतु त्या मेसेजचा स्क्रिनशॉट काढण्याची मुभा सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप सध्या देते. परंतु नव्या फिचरमुळे तुम्ही व्ह्यू वन्स फोटो पाठवताना आधीच स्क्रिनशॉट काढण्याचा ऑप्शन ब्लॉक करू शकता. या फिचरची चाचणी सध्या सुरू आहे. लवकरच हे फिचर रोलआऊट होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.