राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अजित पवार हे जाहीर सभेत व्यासपीठावरुन निघून गेल्यामुळे ही नाराजी उघड झाल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते. पण यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. पण यामुळे भाजपने मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः ‘दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा,मोदी-शहांचे हस्तक होणे केव्हाही चांगले’, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल)
चित्रा वाघ यांचे ट्वीट
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. देहू येथील शिळा स्मारक लोकार्पण सोहळ्यात अजित पवार बोलले नाहीत, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा कांगावा कुणीतरी मोठ्ठ्या नेतीने केला होता. आता स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजितदादांना बोलू दिलं गेलं नाही तर ती पक्षांतर्गत बाब होते. आज कुणाचा आणि कुणी केलाय अपमान?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी ट्वीट करत केला आहे.
देहू येथील शीळा स्मारक लोकार्पण सोहळ्यात अजित पवार बोलले नाहीत तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा कांगावा कुणीतरी मोठ्ठ्या नेती ने केला होता
आणि आता स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजितदादांना बोलू दिलं गेलं नाही तर ती पक्षांतर्गतबाब होते
आज कुणाचा आणि कुणी केलाय अपमान pic.twitter.com/pL75Zz33Jt— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 12, 2022
(हेही वाचाः ‘हिंमत असेल तर मुंबईत मराठी माणूस किती उरलाय हे जाहीर करा’, मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना ‘रोखठोक’ आव्हान)
काय झाले नेमके?
14 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संपन्न झालेल्या सोहळ्यात अजित पवार यांना बोलता आले नाही म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यावरुन चित्रा वाघ यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
Join Our WhatsApp Community