कल्याण- डोंबिवलीत रस्त्यांची दुरवस्था; अनुराग ठाकूर यांनी आयुक्तांना सुनावले खडेबोल

154

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे रविवारपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करत आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. डोंबिवलीचा दौरा आटोपल्यानंतर, त्यांनी सोमवारी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातदेखील दौरा केला. भाजप कार्यकर्त्यांसह व्यापा-यांचीदेखील बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाला भेट देत स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सुरु असलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची दुरवस्था पाहून ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकून हैराण झालो, असे खडेबोल त्यांनी पोलीस आयुक्तांना सुनावले.

अनुराग ठाकूर म्हणाले की, आज चार तास बैठक घेतली. पण काही प्रकल्प अनेक वर्षांपासून सुरु आहेत याचे दु:ख आहे. याबाबत जो त्रास अधिकारी, कर्मचारी वर्गाला झाला पाहिजे तो त्यांना नाही. ज्याप्रकारे लोकप्रतिनिधींनी या बैठकीत आपले मत मांडले आहे. त्यानुसार व्यवस्थेत आणि कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. तसेच, दोन महिन्यांनंतर पुन्हा येऊन या सगळ्याचा आढावा मी घेणार आहे, त्यात किती प्रगती झाली हे पाहणार आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

( हेही वाचा: वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार! हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावरच सांगितली मालकी )

खड्ड्यांवरुन राजू पाटील यांचे खोचक ट्वीट

अनुरागजी आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्काराची असो. बरे झाले आपण घरचा आहेर दिला, असे खोचक ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.