J&K SI Recruitment Scam: दिल्ली-यूपीसह देशभरात 33 ठिकाणांवर CBI ची छापेमारी

184

जम्मू-काश्मीर पोलीस भरती घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (CBI) मंगळवारी मोठी कारवाई केली. सीबीआयचे पथक देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी विविध राज्यांत ३३ ठिकाणी ही शोधमोहीम राबवली जात आहे. ही छापेमारी जम्मू-काश्मीर SSB चे अध्यक्ष खालिद जहांगीर आणि परीक्षा नियंत्रक अशोक कुमार यांच्यासह इतर काही जणांच्या परिसराचीही झडती घेतली जात आहे. जम्मूमध्ये 14, श्रीनगरमध्ये 1, हरियाणात 13 आणि गुजरातमधील गाझियाबाद, बेंगळुरू आणि गांधीधाममध्ये प्रत्येकी एका ठिकाणावर ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास भरपाई देणार; राज्य शासनाचा निर्णय)

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर उपनिरीक्षक भरतीची परीक्षा 27 मार्च 2020 रोजी घेण्यात आली होती. ज्यामध्ये 97 हजार उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. त्यानंतर या भरती परीक्षेचा निकाल ४ जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात 1200 विदयार्थी पास झाले मात्र परीक्षेत हेराफेरीच्या तक्रारीनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

33 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, भरती घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने दुसऱ्यांदा ही शोध मोहीम घेतली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर, सीबीआयने 5 ऑगस्ट रोजी सांगितले होते की, “प्रशासनाच्या विनंतीवरून, 27 मार्च रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी झालेल्या लेखी परीक्षेत अनियमिततेच्या आरोपाखाली 33 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022.” जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळाने (JKSSB) ही परीक्षा घेतली होती.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.