जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत यूक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीनंतर अडकलेल्या नागरिकांसाठी भारताने आवश्यक औषधे आणि उपकरणे असलेली मानवतावादी मदतीची 12 वी खेप युक्रेनला सुपूर्द केली आहे. मानवतावादी मदत ही रशियाबरोबर सुरु असलेल्या युद्धामुळे युरोपीय राष्ट्रांना मदतीसाठी करण्यात येत आहे. युरोपीय राष्ट्रांमधील आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी भारताने सुरु केलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. राजदूत हर्ष कुमार जैन यांनी युक्रेनच्या लोकांसाठी आवश्यक औषधे आणि उपकरणे युक्रेनचे आरोग्य उपमंत्री ओलेक्सी इरेमेन्को यांना सुपूर्द केली.
रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून युद्ध सुरु आहे. मागच्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या युद्धाचे जगात अनेक पडसाद उमटले आहेत. तसेच या युद्धामुळे युरोपीय राष्ट्रांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे.
( हेही वाचा: कल्याण- डोंबिवलीत रस्त्यांची दुरवस्था; अनुराग ठाकूर यांनी आयुक्तांना सुनावले खडेबोल )
Join Our WhatsApp Community