मागच्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. सोमवार संध्यकाळपासून सुरु झालेल्या पावसाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. मुंबईत धो धो पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला आहे. दोन्ही मार्गावरची रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 15 ते 20 मिनीटे उशिराने सुरु आहे.
ठाण्यात वाहतूक कोंडी
ठाण्याच्या तलावपाळी भागात पाणी साचल्याने, ठाणे स्टेशनजवळ चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी तिस-यांदा पात्राबाहेर
यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी ही तिस-यांदा पात्राबाहेर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 50 बंधारे पाण्याखाली गेले असून, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पंचगंगा नदी सध्या तीस फुटांवरुन वाहत असून नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
( हेही वाचा: विनापरवाना व्यवसाय करणा-या कारखान्यावर FDA चा छापा; 800 किलो बनावट पनीर जप्त )
Join Our WhatsApp Community