मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना मनसेला धक्का देणारी घटना गिरगाव येथे घडली आहे. वल्लभभाई पटेल रोड पोलिसांनी मनसेचे विभाग अध्यक्ष वृशांत वडके यांना बलात्कार, फसवणूक आणि धमकी प्रकरणात अटक केली आहे.
(हेही वाचा – सिकंदराबादमध्ये भीषण अग्नितांडव! इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना आगीचा भडका, ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी)
काय घडला प्रकार
एका ४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून वडके यांना अटक केली आहे. वडके हे मनसेचे विभाग अध्यक्ष असून त्यांनी एका ४२ वर्षीय महिलेला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाकडून तिकीट मिळवून देतो असे आमिष दाखवले. या पीडित महिलेला सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला व त्या ठिकाणी बलात्कार केला व याची वाच्यता केल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली, असा आरोप या पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी वृशांत वडके यांच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर वडके यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community