राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे राज्यातील जनतेला मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. तशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्ध महामार्गाच्या पहिल्या टप्प्यांचे उद्घाटन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार असून विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्ध महामार्गाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – शिर्डीतील साईबाबा मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश)
१५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा होती. मात्र तो मुहूर्त लांबणीवर पडला असून आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच उद्घाटन होईल, असे म्हटले जात आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये येणार आहेत. दरम्यान, नागपूर ते शिर्डी या समृद्ध महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन दिवाळीत होणार आहे.
नागपूर ते मुंबई दरम्यान, रहदारी सुलभ व्हावी, या उद्देशाने ३१ जुलै २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. तर राज्याच्या १० जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी याचा प्रत्यक्षात एकूण २४ जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे, असे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community