दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या काही दिवसांपासून मोफत योजनांचा सपाटा लावला आहे. वीजधारकांना वीज देखील फुकट देण्याचा निर्णय दिल्लीतील केजरीवाल सरकारने घेतला होता. पण आता याच निर्णयामध्ये सरकारकडून एक बदल करण्यात आला आहे. अर्ज करणा-या ग्राहकांनाच आता मोफत वीज देणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आता दिल्लीतील ग्राहकांना सरसकट फुकट वीज मिळणार नाही.
राज्यात अनेकांना मोफत वीज नको आहे. त्यामुळे ज्यांना मोफत विजेच्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनाच आता विजेवर अनुदान देण्यात येईल. जे ग्राहक यासाठी अर्ज करतील त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
1 ऑक्टोबरपासून योजना सुरू
दिल्लीत सध्या एकूण 58 लाख वीजधारक असून यापैकी 30 लाख लोकांचं बिल हे शून्य येत आहे तर 17 लाख ग्राहकांना अर्ध बिल येत आहे. त्यामुळे आता जे अर्ज करतील त्यांनाच आता मोफत वीज मिळेल. 1 ऑक्टोबरपासून ही योजना सुरू होईल, अशी घोषणाही अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. यासाठी दिल्ली सरकारने एक मोबाईल क्रमांक जाहीर केला असून या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यावर ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळेल.
Join Our WhatsApp Community