पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये – चंद्रकांत पाटील

187

पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये, अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

( हेही वाचा : गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ नंतर सुरू झाला #BikGayiCongress ट्विटर ट्रेंड)

यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत पुन्हा मिळावी. तसेच नागरिकांकडून घेतली जाणारी ही फरकाची रक्कम वसूल करू नये, अशी मागणी पुणेकर नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. शहरातील मिळकत धारकांना दिली जाणारी ४० टक्के सवलत रद्द करण्यात येत असून, पालिकेने यापुढील काळात ही सवलत देऊ नये, असे राज्य सरकारने यापूर्वीच पालिकेला कळविले आहे. त्यानुसार पालिका आयुक्तांनी ४० टक्के सवलत रद्द केली आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून ही सवलत रद्द झाल्याने नागरिकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. यामुळे वाढीव कराचा बोजा नागरिकांवर पडत आहे आणि ही फरकाची रक्कम तातडीने भरण्याबाबतचे एसएमएस देखील पालिका प्रशासनाने पाठविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली जाईल. तोपर्यंत महानगरपालिकेने नागरिकांकडून ही फरकाची रक्कम वसूल करू नये अशा स्पष्ट सूचनाही पाटील यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.