रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा; हा असणार शेवटचा सामना

213

टेनिसमधील बादशाह अशी ओळख असलेल्या रॉजर फेडररने अखेर निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने पहिल्यांदा पीट सॅम्प्रासचा १४ ग्रॅंडस्लॅम विजेतेपदांचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला.

( हेही वाचा : मुंबईतील विविध ठिकाणी २ ऑक्टोबरपासून पॉलिक्लिनिक सुरु; सकाळी सात ते रात्री दहापर्यंत मिळणार उपचार सेवा)

सप्टेंबर महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळणार नाही

फेडरर आता आपला अखेरचा सामना लेव्हर कपमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २५ सप्टेंबर या काळात खेळवण्यात येणार आहे. रॉजर फेडरर बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याने सोशल मिडियावर याबाबत एक पत्र पोस्ट केले आहे. मी ४१ वर्षांचा असून मी २४ वर्षांमध्ये १५०० हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिस माझ्याशी इतक्या उदारतेने वागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे असे रॉजर फेडररने याद्वारे सांगितले आहे. २४ वर्षांच्या या कारकिर्दीत फेडररने आपल्या प्रतिस्पर्धी आणि जगभरातील चाहत्यांचे आभार मानले आहेत. सप्टेंबर महिन्यानंतर रॉडर फेडरर आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळणार नाही.

रॉजर फेडररविषयी…

  • एकूण २० ग्रॅंडस्लॅमसह कारकीर्द थांबव
  • ण्याचा निर्णय
  • विम्बल्डनमध्ये पहिले ग्रॅंडस्लॅम आणि २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शेवटचे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद जिंकले होते.
  • २०१९ च्या विम्बल्डनच्या अंतिम फेरीत रॉजर फेडरर पोहोचला येथे त्याला नोव्हाक जोकोविचने त्याला पराभूत केले.
  • तीन वर्षांपासून दुखापतींशी झुंज

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.