सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांतर्फे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बांबूपासून हस्तकलेद्वारे बनवलेल्या वस्तू भेट दिल्या. निर्मला सीतारामन हिंदी ‘विवेक’च्या स्व-७५ ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला वांद्रे, मुंबई येथे उपस्थित होत्या. त्याप्रसंगी त्यांनी सेवा विवेकच्या कार्याचे कौतुक केले. आदिवासी महिलांची भेट स्वीकारताना त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, आदिवासी महिला कारागीर सुचिता सांबरे, गीता सांबरे, जान्हवी माळी उपस्थित होत्या.
शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांना घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने ‘सेवा विवेक’ने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
(हेही वाचा महाराष्ट्राच्या सुरक्षा दलांनी मानवंदनेसाठी धोप, फिरंग तलवारी वापरण्याची मागणी )
उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी
यात बांबूपासून विविध प्रकारचे कंदील, राखी, पेन होल्डर, मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार होत असून उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची संधी मिळाली आहे.
Join Our WhatsApp Community