मुंबईत गुरुवारी दिवसभर पाऊस सुरू होता. दुपारनंतर मुंबईतील बहुतांश भागांत जोमाने वारे वाहू लागले होते. सायंकाळी दादर, माटुंगा, दहिसर, बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड आदी भागांत पावसाचा जोर जास्त होता. दुपारच्या अंदाजपत्रात काही भागांत वेधशाळेच्या अतिवृष्टीच्या अंदाजाला मात्र वरुणराजाने फोल ठरवले.
( हेही वाचा : जागतिक तापमानवाढीच्या संकटात आर्टिक्ट महासागरात शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण)
रात्री आणि शुक्रवारीही मुंबईत मुसळधार पावसासह ताशी ३० ते ४० वेगाने वारे वाहतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईकरांची सकाळची सुरुवातच जोरदार पावसाने झाली. दुपारी तीन वाजल्यानंतर पाऊस मुंबईतील बहुतांश भागांत सक्रीय झाला. पावसाचा जोर नसला तरीही पावसाची संततधार सुरु होती. सांताक्रूझ येथील केंद्रात गुरुवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. सायंकाळी सातनंतर कांदिवली, चिंचोली आणि दिंडोशीत पाऊस जास्त होता. सायंकाळी साडेआठपर्यंत तीन तासांत दक्षिण कोकणात कुलाबा अग्निशमन केंद्रात ११.६८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर जास्त नसला तरीही संततधार सुरु असल्याने मुंबईकरांचा संपूर्ण दिवस पावसाचाच ठरला. शुक्रवारनंतर शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील.
Join Our WhatsApp Community