ED Raids: ईडीची मोठी कारवाई, देशभरात 40 ठिकाणी छापेमारी; आता कोण रडारवर?

146

दिल्लीतील दारू धोरणातील कथित अनियमिततेसाठी अंमलबजावणी संचालनालय (ED) देशभरात छापे टाकत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, ईडीचे हे छापे 40 ठिकाणी पडले असून ईडीने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मद्य धोरणातील हेराफेरीबाबत छापे टाकले आहेत. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी या प्रकरणी ईडीने दिल्ली आणि इतर शहरांमध्ये 35 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या ईडीच्या छापेमारीत आता रडारवर कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहे.

आज शुक्रवारी पहाटेपासूनच देशातील 40 ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. दिल्ली, तेलंगणासह देशभरात 40 जागांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. यामध्ये पंजाब, तेलंगणा, नेल्लोर, चेन्नई, दिल्ली एनसीआर परिसरात अधिकाऱ्यांकडून धाडी टाकून चौकशी सुरू आहे. यासह हैदराबादमध्येही 20 ठिकाणी रेड पडली आहे. दिल्लीतील उत्पादन शुल्क अनियमितता संबंधित या धाडी ईडी कडून टाकल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – धावत्या MSRTC बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन जणांचे कापले हात!)

दिल्लीतील भाजप आणि सत्ताधारी आम आदमी पक्ष यांच्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र दारू धोरणाचा मुद्दा राहिला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून उदयाला आलेला आम आदमी पक्ष असून यावर भाजपने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यांच्या शिफारशीनंतर केंद्रीय तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. मात्र, आम आदमी पक्ष केंद्रातील सत्ताधारी भाजपवर तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप वारंवार करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.