मुंबईत शुक्रवारी सकाळी पुन्हा पावसाचे जोरदार सरिंसह पुनरागमन झाले. सकाळपासून मुंबईतील विलेपार्ले, सांताक्रूझ, विद्याविहार, भायखळा, चेंबूर, कुलाबा परिसरात तीस तास सतत पाऊस सुरु होता. शुक्रवारी ढगाळ वातावरणासह बऱ्याच भागात हलका पाऊस राहिल. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट राहिल.
(हेही वाचा – ED Raids: ईडीची मोठी कारवाई, देशभरात 40 ठिकाणी छापेमारी; आता कोण रडारवर?)
ऑगस्ट महिन्यात मुंबईत पावसाचा मोठा काळ खंड पडला होता. परंतु सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून पंधरवड्यापर्यंत पावसाने मुंबई आणि महानगर भागात दमदार पुनरागमन केले. यंदाच्या वर्षांतील सांताक्रूझ केंद्रातील सरासरी पाऊस जुलै महिन्यातच पूर्ण झाला होता. जून महिन्यापासून सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत सांताक्रूझ केंद्रात 2 हजार 810.8 मिमी पाऊस झाला आहे. कुलाब्यातील पावसाची सरासरी शुक्रवारी पूर्ण होईल. जून महिन्यापासून कुलाब्यात 1 हजार 937 मिमी पाऊस झाला आहे. अजून पाच मिमी पाऊस पडल्यास यंदाच्या वर्षांतील कुलाबा केंद्रातील पाऊसही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपूर्वीच पूर्ण होईल.
मुंबईत 300 मिमीहून अधिक पाऊस
जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यासह संपूर्ण कोकणाला पावसाने झोडपले होते. पावसाने कोकणात मुसळधार वृष्टी केली होती. परिणामी, मुंबईत सांताक्रूझ केंद्रात जून ते सप्टेंबर महिन्यात आवश्यक असलेला सरासरी पावसाची नोंद जुलै महिन्यापर्यंतच पूर्ण झाली. जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत सांताक्रूझ केंद्रात 326.4 मिमी पाऊस झाला आहे.
Join Our WhatsApp Community