गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. इलॉन मस्कनंतर आता गौतम अदानी यांचा नंबर लागला असून अदानी यांना पहिलं स्थान गाठण्यासाठी मस्क यांना मागे टाकावं लागणार आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी यांनी दुसऱ्या स्थानी झेप घेतल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ‘ED’ चं ऑफिस! चर्चांना उधाण)
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकून त्याने हे स्थान मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. कधी अदानी आघाडीवर आहे तर कधी बर्नार्ड अर्नॉल्ट. तर, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार गौतम अदानी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Gautam Adani is now world's 2nd richest person
Read @ANI Story | https://t.co/ledcCGsVCE#GautamAdani #ForbesBillionairesList pic.twitter.com/5EEQl2m15t
— ANI Digital (@ani_digital) September 16, 2022
अदानी यांच्याकडे किती आहे मालमत्ता?
ब्लूमबर्गच्या बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 60 वर्षीय गौतम अदानी यांची एकूण संपत्ती (नेट वर्थ) $154.7 अब्ज आहे. बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती देखील $153.8 अब्ज आहे. तर, टेस्लाचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क, जे यादीत पहिल्या स्थानावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती $273.5 अब्ज आहे, तर Amazon चे संस्थापक आणि CEO जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती $149.7 अब्ज आहे.