चायनिज लोन अॅप्सवर केल्या काही दिवसांपासून ईडीकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. त्यातच गुरुवारी ईडीने Paytm सह काही पेमेंट कंपन्यांच्या अॅप्सवर कारवाई करत या कंपन्यांचे तब्बल 46.67 कोटी रुपये गोठवले आहेत. या कंपन्यांच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये मोठ्या रक्कमा असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
ईडीची छापेमारी
ईडीकडून 14 सप्टेंबर रोजी विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर या कंपन्यांचे बँक आणि व्हर्च्युअल खात्यांतील 46.67 कोटी रुपये ईडीने गोठवले आहेत. ईडीने दिल्ली,गाझियाबाद,लखनऊ,मुंबई आणि बिहारमध्ये ही छापेमारी केली होती. याशिवाय एचपीझेड लोन अॅपवरील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने दिल्ली,गुरुग्राम,मुंबई,पुणे,चेन्नई,हैद्राबाद,जयपूर,जोधपूर आणि बंगळुरू येथील Paytm,Easybuzz,Razorpay आणि Cashfree या कंपन्यांच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते.
व्हर्च्युअल खात्यांमध्ये मोठी रक्कम
या सर्व कंपन्यांच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये मोठी रक्कम असल्याचे ईडीच्या तपासादरम्यान समोर आले आहे. Easybuzzच्या खात्यात 33.36 कोटी, Razorpayच्या खात्यात 8.21 कोटी,Cashfreeच्या खात्यात 1.28 कोटी आणि Paytmच्या खात्यात 1.11 कोटी रुपये सापडले आहेत.
काय आहे प्रकरण?
HPZ टोकन या अॅपआधारित कंपनीच्या माध्यमातून बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली युजर्सना अधिक फायदे देण्याचे वचन दिले होते. युजर्सकडून UPI आणि इतर पेमेंट गेटवेद्वारे पैसे गोळा करण्यात आले होते. सुरुवातीला काही रक्कमेचा परतावा गुंतवणूकदारांना देण्यात आल्यानंतर उर्वरित रक्कम ही विविध पेमेंट गेटवे आणि इतर व्यक्तींना हस्तांतरितक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community